बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे शस्त्र बाळगण्याची आणि भाईगिरी बळावल्याची क्रेझ वाढीस लागली आहे. बुलढाणा तालुक्यातील धाड येथे तत्पूर्वी भर चौकात तलवारीने 6 वेळा केक कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींनी चक्क लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.दरम्यान आरोपी विरुद्ध पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकार वैभव मोहिते यांनी धाड पोलिसांना फिर्याद दिली की,20 सप्टेंबर रोजी रात्री दरम्यान मोहिते घरी असताना त्यांच्या घरासमोर दुचाकीस्वार आरोपींनी अश्लील शिवीगाळ करीत पत्रकार वैभव मोहिते यांना वृत्तपत्रात बातमी छापतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. अक्षय जीवनलाल बिलंगे व त्याचे मित्र रोशन गणेश शिंदे, शिवप्रसाद गुजर हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांची गावामध्ये गुंडगिरीमुळे दहशत पसरली आहे.त्यांच्याविरुद्ध भर चौकात तलवारीने केक कापल्याचा गुन्हा दाखल आहे.अशा आशयाची तक्रार पत्रकार वैभव मोहिते यांनी दिल्यावरून आरोपी अक्षय बिलंगे, वय 22 , रोशन गणेश शिंदे वय19,गोलू उर्फ शिवप्रसाद संजय गुजर वय 23 सर्व रा.धाड जिल्हा बुलढाणा यांच्याविरुद्ध पोलिसांनी कलम 296,351(1) ,(3) 3(5) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय केंद्रे करीत आहेत.