लोणार (हॅलो बुलढाणा /लखन जाधव) लोणार येथे १२ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तौफिक कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार तहसील येथे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या व बेताल वक्तव्य केले. तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मो तौफिक हाजी अ लतीफ कुरेशी, शहराध्यक्ष वसीम खान, सामाजिक कार्यकर्ते अरुण भाई घरकुल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, शहराध्यक्ष शेख समद, उपाध्यक्ष बादशाह सेठ, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, सामाजिक कार्यकर्ते मनीष पाटोळे, माजी नगरसेवक संतोष मापारी, करामत भाई रऊफ भाई, अंबादास इंगळे, अजीम चौधरी, सालार खान अकबर भाई अजिज कुरेशी, सलीम पठाण, रफिक कुरेशी, सय्यद मुजाहिद सहेराज मिर्जा शाहरुख कुरेशी ,फैजान खान वसीम कुरेशी, नसुई विद्यार्थी काँग्रेस बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.











Total Users : 3504114