लोणार (हॅलो बुलढाणा/यासीन शेख) सरकारने लाडक्या योजनांच्या घोषणा केल्या. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत’ पैसा टाकला..मात्र शालेय विद्यार्थी सप्टेंबर महिना उजाळूनही गणवेशापासून वंचित आहेत. शिवाय होमगार्ड यांच्या भत्तावाढीच्या प्रस्तावाला ही स्थगिती दिल्याचे समजते.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश, बूट ,दोन पायमोजे व पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.शाळा सुरू होऊन तिन महिने उलटून गेले,तरी गणवेश अजून पर्यंत विद्यार्थ्यांना मिळाले नाही,पायात नवीन बूट अन् अंगात मात्र जुनाच गणवेश अशी अवस्था विद्यार्थ्यांची आहे. जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस शाळेत जायचे?असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहे.शाळा सुरू होण्याच्या आगोदरच शाळेत पुस्तके दाखल झाली.या पुस्तकांचे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.बुटाचे पैसे शाळा समितीच्या खात्यात जमा केले त्यातून बुटांची खरेदी झाली वाटप झाले मात्र,अजून गणवेशाचा पत्ता नाही. गणवेशाचे पैसे शाळा समितीच्या खात्यावर जमा केले जात होते. त्यातून शाळा गणवेशाचे कापड खरेदी करून गावातील एखाद्या टेलरकडून कपडे शिवून घेत होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश मिळतील अशी तरतूद केली जात होती.यंदापासून योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्यात आला. या वर्षापासून राज्य पातळीवरून कापड पुरविण्यात आला हे कापड महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत ते शिवून घेण्यात येणार आहेत.उशिरा का होईना हे कापड सुध्दा प्राप्त झाले.पण आता पर्यंत दोन गणवेशापैकी एक पण गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेला नाही नेमकं अडले कुठे?असा प्रश्न उपस्थित होत आहे.पालक, विद्यार्थी सतत मुख्याध्यापकांकडे गणवेशाबाबत विचारणा करीत आहेत.मात्र, गणवेश कधी मिळणार याचे उत्तर मुख्याध्यापकांकडे सुद्धा नाही.














