बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कसदार अभिनय..दमदार संवाद..आणि विद्यादानाची प्रतिभा लाभलेले साखरखेर्डा येथील रील स्टार शिक्षक सुनील गायकवाड हे सोनी मराठी टीव्ही वाहिनीवर सोमवार व मंगळवारी रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या
‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेत पोलीस कॉन्स्टेबल च्या भूमिकेत सहकलाकार म्हणून झळकणार आहेत.
सुनील गायकवाड हे सहकार विद्या मंदिर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.विद्यादाना च्या कामासह त्यांची कलाक्षेत्राशी नाळ जुळली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी अनेक रील बनविल्या.ते प्रसिद्धी मागे लागले नाहीत तर ‘सिद्धी’ मागे झपाटलेले आहेत.त्यांच्या अभिनयामुळे गायकवाड यांचे हजारो फॉलोवर्स असून त्यांनी यापूर्वी छोट्या भूमिका वठविल्या आहेत.सुनील गायकवाड हे लवकरच एका मोठ्या बॅनर च्या चित्रपटात सुद्धा भूमिका करणार असून,यावर आत्ताच बोलणे उचित नाही असे ते म्हणाले. गायकवाड सोनी मराठी टीव्ही वाहिनीवर झळकणार असल्याने ही साखरखेर्डा गावासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.