spot_img
spot_img

म्हणून पोलिसाने 3 गोळ्या झाडल्या ! -अटल गुन्हेगाराने पोलिसांना दिला गूंगारा!

मलकापूर (हॅलो बुलढाणा /करण झनके) आरोपीने तलवार उगारून पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसाने तीन गोळ्या फायर केल्याची घटना मलकापूर येथे घडली.

ही घटना कशी घडली ते या बातमीत वाचावे.. पोलीस सूत्रांनुसार, 31 ऑगस्ट दरम्यान मलकापूर पोलीस स्टेशनला माहीती मिळाली की, मनोजसींग सिकंदरसींग टाक म्हाडा कॉलनी मलकापुर हा म्हाडा कॉलनी येथे आला असुन त्याचे शेजारी राहणा-या लोकांना मारहाण करीत आहे. सपोनि वर्गे यांनी तात्काळ सदरबाबत वरीष्ठांना माहीती देवुन म्हाडा कॉलनी येथे पोलीस अधिकारी / अंमलदार व इतर पोलीस स्टाफ यांचेसह रवाना झाले. तेथे पोलीसांनी मनोजसींग सिकंदरसीग टाक याचा शोध घेतला परंतु तो तेथे दिसला नाही. वरुन पोलीस त्याचे पत्नी व आई यांना मनोजसींग बाबत विचारपुस करत असतांना आरोपी मनोजसींग टाक हा बाजुचे झाडाझुडपातुन धावत आला.

त्याचे हातात धारदार शस्त्र लोखंडी तलवार होती. व तो धावत येवुन त्याने पोउपनि सुनिल घुसळे यांचेवर तलवारने वार केला. परंतु सदर वार त्यांनी हुकविला त्यानंतर नमुद आरोपी हा इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर हल्ला करण्यासाठी धावला. त्यावेळी सपोनि. वर्गे यांनी सोबत असलेले शस्त्रधारी पोकॉ. शुभम ठाकरे यांना पोलीसांचा जिव वाचविण्याच दृष्टीने त्यास फायर करणेबाबत सांगीतले. म्हणुन दोन गोळया फायर केल्या. तथापी आरोपी नामे मनोजसींग टाक हा आणखी चवताळुन पोलीसांचे मागे तलवार घेवुन धावला म्हणुन सपोनि वर्गे यांनी अजुन एक राउंड फायर करण्यास सांगीतलेवरुन पोकॉ. शुभम ठाकरे यांनी तीसरा राउंड फायर केला. परंतु आरोपीने सदरचा वार चुकवुन अंधराचा फायदा घेवुन आरोपी बाजुचे झाडाझुडपात पसार झाला. त्यानंतर घटनास्थळी म्हाडा कॉलनी येथे आम्ही पोलीस निरीक्षक गणेश गिरी व श्री. देवराम गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी सा मलकापुर असे आरसीपी पथकासह येवुन फरार आरोपीचा शोध घेतला परंतु नमुद आरोपी हा मिळुन आला नाही.

आरोपी हा मनोजसींग टाक हा पोलीस स्टेशन मलकापुर शहर येथील कुख्यात आरोपी असुन त्याचेवर पोस्टे मलकापुर शहर येथे मालमत्ता चोरीचे, शरीरीविरुध्दचे तसेच शस्त्र अधिनियम अन्वये बरेच गुन्हे दाखल आहेत. व नमुद आरोपी 08 गुन्हयामध्ये पोहीजे आरोपी (Wanted) आहे. नमुद आरोपी विरुध्द 05 ते 06 जिल्हयांमध्ये विवध कलमांखाली गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोउपनि सुनिल घुसळे यांचे लेखी रिपोर्ट वरुन नमुद आरोपीविरुध्द अप नं. 434/2024 कलम 109, 132, 125, 121 (1), 231 BNS सहकलम 4,25 आर्म अॅक्ट, 3,25 अॅक्ट प्रमाणे पोस्टे मलकापुर शहर यथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलढाणा जिल्हयात नव्यानेच रुजु झालेले पोलीस अधिक्षक मा. श्री. विश्व पानसरे साहेब यांनी आज
दिनांक 01/09/2024 रोजी सकाळी सदरच्या घटनास्थळी भेट दिली व नमुद फरार आरोपीचा शोध व गुन्हयाचे तपासाबाबत मार्गदर्शन केले. आरोपी शोध करीता विशेष पथके नेमण्यात आले असुन पोलीस पथके विविध जिल्हयात रवाना केले आहेत. आरोपी शोध सुरु आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!