spot_img
spot_img

Exclusive ‘अंधार फार होतोय! पण ‘त्या’ जपून ठेवा!’ -जयश्रीताई शेळकेंनी हेडमास्तरांना खडसावले! -आरोपी शिक्षकाला पाठीशी घालू नका, फाशीचीच शिक्षा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा तालुक्यातील एका शाळेतील 4 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडल्याने काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके थेट सदर शाळेत धडकल्या. दरम्यान हेडमास्तरांना खडेबोल सुनावत

आरोपी शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी त्याला पाठीशी घालू नये,सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महिला सुरक्षित नाहीत. अंधार फार होतोय.. त्यामुळे विद्या मंदिरातील प्रत्येक ‘पणती’ जपून ठेवा! असे शेळकेंनी हेडमास्तरांना ठणकावले.

विशेष म्हणजे वर्दडी येथील शाळेत इयत्ता पहिली ते आठवी मध्ये 215 इतकी पटसंख्या आहे. त्यामध्ये 100 मुली आहेत.मात्र आजपर्यंत या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकही महिला शिक्षिका कार्यरत नाही,हे दुर्दैवाची बाब आहे.बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील अनेक भागातून महिला अत्याचाराच्या गंभीर घटना समोर येत आहे.काल महायुती सरकारचा विरोधकांचा व महिलांचा मुकसंताप ही उफाळून आला.अशात सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी येथील शाळेतील 4 अल्पवयीन मुलींवर आरोपी शिक्षक खूशाल उगले याने
लैंगिक अत्याचार केला.आरोपीवर पोक्सो,अॅट्रॉसिटी आणि लैंगिक छळ आदी गुन्ह्यांत अटक केली आहे. त्याला मेहकर न्यायालयाने मंगळवार, 28
ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली
आहे.या प्रकरणात 13 पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.दरम्यान आज जयश्री शेळके यांनी शाळेवर धडक देऊन हेडमास्तरांना चांगलेच धारेवर धरले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!