5.4 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

बुलढाणा ‘जय भीम एकता परिषदेने’ दणाणणार! -उपस्थित राहण्याचे सतीश पवार यांचे आवाहन

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भीम आर्मीची जिल्ह्यातील वाटचाल जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात दमदार सुरू आहे. विविध विषय हाताळत ते मार्गी लावण्यासोबतच संघटन मजबूत केले जात आहे. सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्यासोबत चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, त्या अनुषंगाने बुलढाण्यातील गोलांडे लॉन येथे ११ ऑगस्ट २०२४ रोजी भीम आर्मीच्या वतीने ‘जयभीम एकता परिषदे’ आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेला भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे व सुनील गायकवाड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये देशभर सुरू असलेल्या संविधानविरोधी घडामोडींवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला घटनाबाह्य निर्णय, राजकीय परिवर्तन काळाची गरज समस्या व उपाय, आंबेडकरी चळवळीची सद्यस्थिती यामधील दशा आणि दिशा, बौद्ध समुदायाचे राजकीय अवमूल्यांकन व बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास, राजकीय नेतृत्व आणि समाजातील वैचारिक वर्ग यांच्यामध्ये समन्वय असणे काळाची गरज, तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा व सहकार या संदर्भात स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे या विषयांचा समावेश या परिषदेत प्रामुख्याने करण्यात आला आहे. या परिषदेदरम्यान होणारी चर्चा व आलेल्या सूचनांची नियमावली बनवून त्यावर समाजाला अपेक्षित काम करण्याचा संकल्प भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केला आहे.
जयभीम एकता परिषदेला जिल्हाभरातील साहित्यिक, विचारवंत, सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सतीश पवार यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!