बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भाजपा आमदाराच्या अंगरक्षकानं स्वतःवर गोळी झाडूनआत्महत्या केली. उपचारादरम्यान या अंगरक्षकाचा मृत्यू झाला आहे.
अजय उद्धवगीर गिरी वय 38 वर्षे राहणार पोलीस वसाहत मुख्यालय बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे. त्यांनी कौटुंबिक किंवा आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी दिली आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी सर्विस रिवालव्हर मधून
डोक्यात गोळी घालूनआत्महत्या केली.अजय गिरी हे आज घरीच होते. त्यांनी स्वतःच्या बंदुकीची गोळी स्वतःवर चालवली.दरम्यान त्यांना जिल्हा बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले परंतु त्यांना डॉक्टर येवले मॅडम यांनी मृत घोषित केले आहे.गिरी हे बुलढाणा पोलीस मुख्यालयात नोकरी करीत होते.त्यांनी स्वतःच्या सर्विस रिवाल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी दिली आहे.














