spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE! देऊळगाव राजा, लोणार, मेरा बु. ते बुलढाणा-मलकापूरपर्यंत FDA चा दणका! जिल्ह्यातील ८ दुकानांचे परवाने निलंबित; खवय्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना चाप! पण बुलढाण्यातील ‘थाटबाट’चा थाट कायम कसा? दोन-तीन वेळा कारवाई झाल्याची चर्चा; FDA चा धाक की कारवाईचा केवळ कागदी खेळ?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवाळीचा फराळ, मिठाई आणि हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाताय? मग सावधान! बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) तपासणीत अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने तब्बल आठ अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अन्न सुरक्षा कायद्याच्या परिशिष्ट-४ मधील स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

कारवाई झालेल्या आस्थापनांची यादी अशी

१) धन्दुकिया उपहारगृह, बुलढाणा ६ नोव्हेंबर

२) अंबिका फूड्स, बुलढाणा १३ नोव्हेंबर

३) प्रकाश फूड प्रोडक्ट्स, येळगाव १३ नोव्हेंबर

४) ओम खवा उत्पादन, लोणवाडी १३ नोव्हेंबर

५) राजस्थान बिकानेर स्वीट मार्ट, मेरा बु. ७ नोव्हेंबर

६) सोहम फूड प्रॉडक्ट्स, लोणार ५ नोव्हेंबर

७) अम्माजी फूड अँड स्पाइस, देऊळगाव राजा ५ नोव्हेंबर

८) जग्गू मामाचा ढाबा, मलकापूर २० नोव्हेंबर.

मात्र खरी खळबळ बुलढाण्यातील ‘थाटबाट’ हॉटेलबाबत!

स्टेट बँक ते सर्किट हाऊस मार्गावरील क्लब लेआऊट परिसरातील ‘थाटबाट’ हॉटेलवर यापूर्वी दोन ते तीन वेळा FDA ची कारवाई झाल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली आहे. मात्र कारवाईचे नेमके स्वरूप, परवान्याची सद्यस्थिती आणि हॉटेल सुरू ठेवण्यास असलेली कायदेशीर परवानगी याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे.

कारवाईनंतर प्रत्यक्ष तपासणी होते का? निलंबित परवान्यावर व्यवसाय सुरू असल्यास जबाबदार कोण? FDA चे अधिकारी पुन्हा तपासणी करणार का? ‘थाट बाट’ कारवाई प्रकरणात एफडीएचे अधिकारी व कर्मचारी संतगतीने कारवाई करतांना व पांघरून टाकतांनाचे चित्र दिसून आले.कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे साहेब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असतांना केवळ कागदोपत्री कारवाई पुरेशी ठरणार नाही.नियमभंग करणाऱ्यांवर कठोर नियंत्रण हवे,अशी मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!