बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा शहराच्या व्यापारी क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. शहरातील नामांकित ‘प्रकाश जनरल स्टोअर’चे संचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक अमित नारडिया यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहरातील व्यापारी वर्गाला मोठा धक्का बसला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
व्यापारी विश्वात ओळख निर्माण करणाऱ्या उद्योजकाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बुलढाण्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अमित प्रकाश नारडिया हे बुलढाणा शहरातील परिचित मनमिळाऊ व्यापारी होते. ‘प्रकाश जनरल स्टोअर’च्या माध्यमातून त्यांनी व्यापार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, मनमिळावू स्वभाव आणि व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.
मात्र, अचानक समोर आलेल्या त्यांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे व्यापारी बांधव, परिचित आणि हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे.
नेमके काय घडले? आत्महत्येमागचे कारण काय?
अमित नारडिया यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. आत्महत्येमागील नेमके कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे बुलढाणा शहरातील व्यापारी वर्तुळात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर ‘हॅलो बुलढाणा’ सविस्तर अपडेट देणार आहे.













Total Users : 3807437