spot_img
spot_img

मलकापूर पांगऱ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार! एकाच दिवशी पाच जणांवर हल्ला; 3 वर्षांच्या चिमुरडीसह महिला-वृद्ध जखमी!शेळ्या-कोंबड्यांनाही सोडलं नाही; गावात दहशत, ग्रामपंचायतीने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे शुक्रवारी (दि. 19) पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत गावकऱ्यांची झोप उडवली. सकाळपासून सायंकाळपर्यंत एकामागून एक नागरिकांवर झडप घालत या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याने गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्यावरच न थांबता शेळ्या आणि कोंबड्यांवरही हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सकाळी साडेसहाच्या सुमारास दूध आणण्यासाठी बसस्थानक परिसरातील डेअरीकडे गेलेल्या दिलीप बाळकिसन साळवे (48) यांच्यावर कुत्र्याने अचानक हल्ला केला. त्यानंतर दुपारी घराच्या अंगणात खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षीय प्रियल संदीप शिनगारे हिच्या पाठीला चावा घेतला. प्रथमोपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर बसस्थानकावर एका प्रवासी महिलेवर झडप घालण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांनी कुत्र्याला हुसकावले; मात्र तो थेट जवळच्या सलूनमध्ये घुसला आणि सदानंद मनोहर आंबेकर (22) यांच्या पायाला चावा घेतला. दुपारी अडीचच्या सुमारास बसमधून उतरणाऱ्या वत्सला किसनराव खरात (65) यांनाही कुत्र्याने लक्ष्य केले.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी समीर खान अब्बास खान पठाण (20) यालाही याच कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती आहे.

एकच कुत्रा वारंवार हल्ले करत असताना प्रशासन नेमकं कशाची वाट पाहतंय? महिला, वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!