बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी महत्वाचे सणोत्सवांच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत शांतता राहून, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू येऊ नये, या करीता पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात बुलढाणा पोलीस दला कडून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान एसपी निलेश तांबे यांच्या नेतृत्वात अवैध धंद्यांवर कारवाईचा तडाखा सुरुच असून दोन कोटी 15 लाख 67 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांचा शोध घेऊन, त्यांचेवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील आठवड्या पासून अवैध धंद्यां विरुध्दची मोहीम अधीक तीव्र करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरात केलेल्या कारवाईचे विवरण खालील प्रमाणे
▪️अवैध दारु कार्यवाही :
जिल्ह्यामध्ये अवैध देशी, विदेशी दारु, गावरान हातभट्टी दारुच्या केसेस करुन त्यामध्ये 76 केसेस करुन 76 आरोपी पकडण्यात आले. आरोपी कडून 3,92,180 रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
▪️’जुगार कार्यवाही :
जिल्ह्यामध्ये जुगार अॅक्ट प्रमाणे 21 केसेस करुन 63 आरोपी पकडण्यात आले. आरोपी कडून 2,99,390 रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
▪️आर्म अॅक्ट कारवाई :
जिल्ह्यात आर्म अॅक्टच्या एकूण 02 केसेस करण्यात आल्या असून त्यामध्ये 04 आरोपीकडून, पिस्टल- 01, मॅग्झीन- 01, चाकु 01, कोयता-01 मोटार सायकल 02, मोबाईल- 01 असे शस्त्र जप्त असुन 1,86,300 रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
▪️एनडीपीएस कारवाई :
जिल्ह्यात अवैधपणे गांजा बाळगणाऱ्या इसमां विरुध्द कारवाई करुन त्यामध्ये 02 केसेस कार्यवाही करण्यात आली असून 02 आरोपी 1.170 कि.ग्रॅ. गांजा किं.58,500 रु. चा माल जप्त केला आहे.
▪️अवैध गौण खनिज (रेती):
अवैध गौणखनीज रेती चोरी- 04 केसेस, 08 आरोपी ताब्यात घेवुन, त्यांचे ताब्यातुन वाहनासह 2,06,31,000 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नेतृत्वात पोलीसांनी मागील आठवड्यापासून अवैध धंद्यांविरुध्दची मोहिम प्रभावीपणे राबविली असून त्यामध्ये विवीध हेडखाली 105 गुन्हे दाखल करुन, 153 आरोपींवर कारवाई करतांना तब्बल 2,15,67,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध धंद्यांविरुध्दची कारवाई यापुढे देखील सुरु राहणार आहे, अशी माहिती एसपी निलेश तांबे यांनी ‘हॅलो बुलढाणा’ ला’ दिली.













Total Users : 3457363