बुलढाणा (हॅलो बुलढाणा) हातात सत्तेचे कोणतेही पद नाही… ना आमदारकी, ना खासदारकी! तरीही बुलढाणा जिल्ह्याच्या सहकाराच्या राजकारणात पुन्हा एकदा डॉ. राजेंद्र शिंगणे यांचेच नेतृत्व ‘सुपरहिट’ ठरले आहे. दि बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने निवडणूक झालेल्या सातपैकी तब्बल पाच जागांवर विजयाचा झेंडा फडकविला. या निकालानंतर २१ सदस्यीय संचालक मंडळात सहकार पॅनलचे संख्याबळ १९ वर पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
या दणदणीत विजयानंतर डॉ. शिंगणे यांनी सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाईल पिक्चरही बदलले. डोक्यावर मानाचा फेटा आणि अंगात जॅकेट असलेला त्यांचा रुबाबदार फोटो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे सिंदखेडराजाचे युवा नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी ‘थार ROXX’वर उभे राहून विजयी जल्लोष केला.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत जिल्ह्यातील एका आमदाराचा अपवाद वगळता बहुतांश आमदार, विधान परिषदेचे आमदार आणि विविध पक्षांतील सहकारातील दिग्गज डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. सहकार पॅनलची संपूर्ण सूत्रे त्यांच्या हाती होती.
निवडणुकीसाठी तब्बल २९८ नामांकन अर्ज दाखल झाले; मात्र अखेर केवळ २३ अर्ज रिंगणात कायम राहिले. तब्बल २७५ अर्ज मागे घेण्यासाठी दिग्गजांशी समन्वय साधणे आणि बंडोबस्त थोपविणे हे सोपे आव्हान नव्हते. सत्तेचे पद नसतानाही राजकीय अनुभव, नैतिक वजन आणि सहकारातील प्रभावाच्या जोरावर डॉ. शिंगणे यांनी ही मोट बांधली











Total Users : 3333711