बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने सातपैकी पाच जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर ऐनवेळी मैदानात उतरलेल्या स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलने दोन जागा खेचून आणत जिल्ह्याच्या सहकारातील एकतर्फी सत्तेला पहिल्यांदाच जोरदार धक्का दिला!
महिला राखीव मतदारसंघात सहकार पॅनलच्या पुष्पाबाई रामदास बारवकर आणि अस्मिता प्रदीप हेलगे यांनी दणदणीत विजय मिळवत सहकारचा दुहेरी झेंडा फडकविला. दोन्ही जागा जिंकल्याने सहकारच्या गोटात जल्लोष उसळला आहे.
दरम्यान, ओबीसी मतदारसंघातून सहकार पॅनलचे गोविंदराव मिरगे यांनी बाजी मारली. त्यांनी परिवर्तन पॅनलचे मनोज दांडगे यांचा पराभव केला. अंतिम निकालात सहकारने ‘सातावर पाच’ असा दमदार आकडा गाठला; मात्र परिवर्तन पॅनलने मिळविलेल्या दोन जागांनी जिल्ह्याच्या सहकार राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याचे स्पष्ट झाले आहे!











Total Users : 3333709