spot_img
spot_img

BREAKING जिल्हा बँकेत ‘सहकार’चा चौकार; रायमुलकरांनी मारली बाजी! दुसरीकडे ज्ञानेश्वरदादा पाटलांनी फडकविला ‘परिवर्तन’चा दुसरा झेंडा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत निकालांचा धडाका सुरू असून राजकीय लढत आणखी तापली आहे. अनुसूचित जाती मतदारसंघातून सहकार पॅनलचे डॉ. संजय रायमुलकर यांनी विजय खेचून आणत पॅनलच्या चौथ्या जागेवर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे सहकार पॅनलच्या गोटात जल्लोष उसळला आहे. दुसरीकडे, नागरी बँका-पतसंस्था मतदारसंघातून स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी बाजी मारली. त्यांच्या विजयामुळे परिवर्तन पॅनलने दुसऱ्या जागेवर झेंडा फडकवत निवडणुकीतील आपली ताकद दाखवून दिली आहे. निकालागणिक जिल्हा बँकेतील सत्तेचे चित्र अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे!

पुढील अपडेट थोड्याच वेळात…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!