spot_img
spot_img

BREAKING संग्रामपूरात चार मतांनी ‘सहकार’ची बाजी; लोणारमध्ये मापारींचा एकतर्फी दणका!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने संग्रामपूर आणि लोणारमध्ये विजयाचा झेंडा फडकविला आहे. संग्रामपूर मतदारसंघात सहकार पॅनलचे श्रीकांत मारोडे यांनी अटीतटीच्या लढतीत १५ मते मिळवत चार मतांनी विजय खेचून आणला. ‘खटारा’ चिन्ह घेऊन स्वतंत्रपणे मैदानात उतरलेल्या विश्वनाथ झाडोकार यांना ११ मतांवर समाधान मानावे लागले.

लोणारमध्ये मात्र सहकार पॅनलने प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः धुव्वा उडविला. संतोष मापारी यांनी तब्बल ३० मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला, तर शिवनंदा खंड यांना केवळ सहा मते मिळाली. या दुहेरी विजयाने सहकार पॅनलची जिल्हा बँकेवरील पकड अधिक मजबूत झाली आहे.

पुढील अपडेट थोड्याच वेळात…

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!