spot_img
spot_img

जिल्हा बँकेचा पहिला कौल ‘फिफ्टी-फिफ्टी’! मलकापुरात शिवा तायडे, बुलढाण्यात सुनील उदयकार विजयी; दोन्ही पॅनलने उघडले खाते!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीचे दोन निकाल हाती आले आहेत. पहिल्याच निकालात मतदारांनी दोन्ही प्रमुख पॅनलला प्रत्येकी एक जागा देत निवडणुकीतील उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे.

मलकापूर मतदारसंघातून स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलचे शिवचंद्र ऊर्फ शिवा तायडे यांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. तर बुलढाणा मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुनील उदयकार यांनी बाजी मारत आपल्या पॅनलचे खाते उघडले.

बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. दोन निकालांनंतर सध्या चित्र ‘एक त्यांचा… एक यांचा!’ असे झाले असून, उर्वरित जागांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून पुढील निकाल निर्णायक ठरणार आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!