बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे अपघाताच्या घटना वाढत असून, बुलढाणा- चिखली मार्गावरील अंत्री फाट्याजवळ चारचाकी वाहन व दुचाकीचा आमने-सामने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रात्री 9.30 वाजता घडली आहे.
बुलढाणा ते चिखली मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. रस्त्यावरून वाहने सुसाट धावत असताना,पायी चालणाऱ्याच्या उरात धडकी भरावी असा वाहनांचा वेग असतो.रात्रीच्या वेळेला तर समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटमुळे जाणाऱ्याला क्षणभर काही दिसतच नाही.त्यामुळे अनेक वेळा नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. बुलढाणा- चिखली मार्गावरील अंत्री फाट्याजवळ काल अशी अपघाताची घटना घडली. चार चाकी वाहन आणि दुचाकी एकमेकावर आढळल्याने अपघात होऊन एक पंचवीस वर्षे युवक गतप्राण झाला आहे. तुषार विष्णू बाहेकर (वय 25) रा. किन्होळा असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे बाहेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










Total Users : 3283824