spot_img
spot_img

EXCLUSIVE मुंढे साहेब बुलढाणा जिल्ह्यात या; अधिकारी पैसे खाऊन रायले..! खामगावातील आजीचा बिनधास्त अंदाज!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘तुकाराम मुंडे साहेब..जरा बुलढाणा जिल्ह्यात या! खामगावात तेलात भेसळ, फळात भेसळ सारी भेसळ सुरू हाय..मोठा भ्रष्टाचार सुरू हाय.. सारे अधिकारी पैसे खाऊन रायले!’ हे शब्द आहेत भेसळखोरीची चीड येणाऱ्या खामगावातील एका आजीचे! राज्यभरातील भेसळखोरां विरुद्ध मुंढे यांच्या धडक कारवाया पाहून या आजीला खामगावातही भेसळखोरी विरोधात धडाकेबाज व पारदर्शी कारवाई अपेक्षित असल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

तुकाराम मुंढे साहेब सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्यांमध्ये प्रामाणिक, कठोर आणि पारदर्शक प्रशासनासाठी त्यांची मोठी लोकप्रियता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासारखा अधिकारी असावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना असते, ज्याचे पडसाद सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील बॅनरबाजीमध्ये उमटताना दिसत आहेत. राज्यसह बुलढाणा जिल्ह्यात देखील भेसळ होत असल्याचा आरोप होतोय.

स्वयंपाक घराचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे दूध,खावा यामध्ये जीवघेणी भेसळ होत आहे. तुपात डालडा तर खव्यात रव्याची भेसळ केली जात आहे.फळे-भाजीपाला जलद पिकावण्यासाठी घातक रसायनांचा अतिवापर केला जात आहे,मात्र अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. खामगावच्या आजीने तर बिनधास्तपणे व्हिडिओ तयार करून ‘मुंढे साहेब’ बुलढाणा जिल्ह्यात या..इथे अधिकारी पैसे खात असून खामगावात मोठी भेसळखोरी सुरू असल्याचा उघड आरोप केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!