बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला गेली होती.प्रदीर्घ दिवसाच्या पायी प्रवासानंतर ही पालखी आज बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेवर दाखल झाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी श्रींच्या पालखीच्या आगामनाचे स्वागत करून पोलीस फौज फाट्यासह परतीचा मिरवणूक मार्ग सुकर करीत आपल्या खाकी वर्दीतील कर्तव्याला श्रद्धेची जोड दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर आगमन होताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले. ही पालखी 19 ऑगस्ट रोजी शेगावात दाखल होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला गेली होती.हजारो वारकऱ्यांच्या पायी प्रवासानंतर ही पालखी आज मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे. पालखीचे आज आगमण होणार असल्याने पंचक्रोषीतील भाविकांनी पालखीच्या स्वागतासह दर्शनासाठी पालखीमार्गावर सकाळपासूनच हजेरी लावली होती. विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवर पालखी पोहचताच कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पालखीचे जंगी स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, टाळ -मृदंगाचा गजर आणि ‘जय गजानन’च्या जयघोषात पालखीतील वारकऱ्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर पोलीस प्रशासनाच्या
वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी, भगव्या पताका लावण्यासह रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.दरम्यान दक्षता म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी वाहतुकीच्या सुनियमनासाठी पालखी मार्गावरील वाहतूक वळवली असून पालखी मार्ग सुकर व्हावा म्हणून पोलीस विभाग प्रयत्नशील आहे.










Total Users : 3279278