मेहकर (हॅलो बुलढाणा) शहरातील जवळपास सहा वर्षे चाललेल्या नवीन बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन एक दीड महिन्यांचा कालावधी उलटला मात्र जेंव्हापासून बसस्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले तेंव्हापासून बसस्थानकातील स्वच्छतागृह बंदावस्थेत असल्याने नैसर्गिक विधीसाठी महिला व पुरुष प्रवाशांची कुचंबना होत आहे. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष वेधण्याची मागणी जोर धरत आहे.
बस स्थानकावरील स्वच्छतागृह
ज्या कंत्राटदाराला देण्यात आले ते कंत्राटदार रात्री ९ वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल ११ तास कुलूप लावलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे सकाळी ४ वाजतापासून बसस्थानकात येणाऱ्या महिला भगिनी व पुरुष बांधवांची नैसर्गिक विधीसाठी गैरसोय होत आहे. याबाबत सकाळी बसस्थानक परिसरात वर्तमान पत्र वितरण करणाऱ्या विशाल एडसकर, पत्रकार अविनाश लाड, किशोर लाडुकार, अंबादास इंगळे आदींनी बसस्थानकाचा कारभार पाहणारे अधिकारी अतुल सोनूने यांना यासंदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याबाबत डेपो मॅनेज हर्षल साबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती बिघडलेली असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.










Total Users : 3276456