बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना कार्यरत आहे. आज 10 ऑगस्टला येथील आरटीओ कार्यालयात संघटनेच्या एका सभेत पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली.
अध्यक्षपदी श्रीकांत पागोरे यांची तर तुकाराम थोरवे यांची उपाध्यक्षपदी तसेच योगेश पुसणे यांची सचिव या पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांचे वेतन, पदोन्नती, सेवा प्रवेश नियम आणि आकृतीबंधाची अंमलबजावणी यांसारख्या मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे व आंदोलन करणे,हक्कांचे संरक्षण,अडचणी सोडवणे आदी कार्य करते.
आज दि.10 ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा येथे कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी सभा घेण्यात आली. या सभेला श्री गजानन तनपुरे कार्यालय अध्यक्ष व करण गुट्टे वरिष्ठ लिपिक, अनंता सोर,विजय माहुलकर, पन्नालाल राजपूत, आशिष सोळंकी, योगेश पुणेकर हे कनिष्ठ लिपिक उपस्थित होते. सभेमध्ये श्रीकांत पागोरे यांची अध्यक्षपदी तर श्री तुकाराम थोरवे यांची उपाध्यक्षपदी तसेच योगेश पुसणे यांची सचिव या पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.










Total Users : 3276456