चिखली (हॅलो बुलढाणा) भारतमातेचे वीर सुपुत्र पॅरा कमांडो हरिदास मधुकर कापसे यांच्या अंत्ययात्रेला काही वेळापूर्वी चिखली येथील शेलसुर या मुळ गावात त्यांच्या निवासस्थाना
पासून सुरुवात झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार श्वेता महाले,मुख्यमंत्री यांचे पीए विद्याधर महाले यांच्यासह इतरही नेते, प्रतिष्ठित व्यक्तीं व नागरिकांनी मोठी गर्दी केली असून,’अमर रहे.. अमर रहे!’ चा जयघोष करण्यात येत आहे.
हुतात्मा श्री. हरिदास मधुकर कापसे यांचा काहीच मिनीटात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी शेलसुरात मोठी गर्दी केली आहे.
चिखली मतदारसंघातील मौजे शेलसुर येथील जवान हवालदार श्री. हरिदास मधुकर कापसे यांना सुमना-लपतल (उत्तराखंड) येथे भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना दि. ७ ऑगस्ट रोजी वीरमरण आल्याच्या बातमीने चिखली तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील समाजमन सुन्न झाले. आज सोमवारी 10 ऑगस्टला त्यांचे पार्थिव चिखली शहरात दाखल झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी जाऊन अंत्यदर्शन घेतले. देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाच्या शौर्याला आणि देशसेवेला मनःपूर्वक सलाम,
अशी शब्दांजली आमदार श्वेता महाले यांनी यावेळी वाहिली. श्री. हरिदास मधुकर कापसे यांच्या या सर्वोच्च बलिदानाचा शेलसुर गावासह संपूर्ण चिखली मतदारसंघाला अभिमान आहे.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. परमेश्वराने कापसे कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आणि वीर जवानाच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभावी,अशी प्रार्थना देखील आ. श्वेता महाले यांनी यावेळी केली.










Total Users : 3270423