बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शालेय जीवनातील विद्यार्थी लोकशाहीमुळे जीवनमूल्यांची रुजवून होते तसेच लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रिती तायडे यांनी भारत विद्यालयामध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी प्रसंगी केले.
भारत विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच 1954 पासून विद्यार्थी लोकशाहीचा प्रयोग शाळेत राबविला जातो. त्यातून निवडून आलेले प्रतिनिधिंचे विद्यार्थी मंत्रिमंडळ बनते व ते वर्षभर आपापल्या खात्याचा कारभार करतात अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते. असे मत मुख्याध्यापक तथा विद्यार्थी राज्याचे राष्ट्रपती प्रल्हाद गायकवाड यांनी व्यक्त केले. मतदान इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारे घेण्यात आले.त्यासंबंधीचे तांत्रिक सहाय्य संगणक शिक्षक विजय मोरे यांनी उपलब्ध करून दिले. निर्वाचनाचा अहवाल निर्वाचन आयुक्त नेहा पोपळघट यांनी सादर केला व त्यांना उपनिर्वाचन आयुक्त म्हणून सारा कच्छी यांनी मदत केली. प्रत्यक्ष निर्वाचनाच्या कार्यक्रमासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून वर्ग 10 ब च्या विद्यार्थ्यांनी काम केले. तर साधना का पथकठीण हैl हे गीत सौ. गौरी देशपांडे मॅडम यांनी सादर केले.सौ.दिपाली पाटील मॅडम यांनी डॉ. प्रीती राहुल बाहेकर यांचा शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तथा विद्यार्थी लोकशाहीची संकल्पना शिक्षक डॉ. शिवशंकर गोरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय मनोज बैरागी यांनी करून दिला. राष्ट्रपतींच्या हस्ते सभासद, मुख्यमंत्री इतर मंत्री व सभापती यांना शपथ देण्यात आली… सदर कार्यक्रमाचे संचालन कु.वेदिका गवळी व कु. श्रेया राजपूत तर आभार प्रदर्शन कु. अक्षदा झिने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग 10 ड चे विद्यार्थी तसेच वर्गशिक्षक, दिनेश गर्गे , संकेत आकाळ यांनी मेहनत घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.










Total Users : 3269947