spot_img
spot_img

BREAKING थरारक! दुचाकीला धडक देऊन पळतांना भरधाव कार विहिरीत कोसळली! दोघींचा मृत्यू; एक गंभीर!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दुचाकीला धडक देऊन पळतांना भरधाव कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने झालेल्या थरारक अपघातात दोन महिलांचा दुदैवी मृत्यू झाला तर एक चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जालना जिल्ह्यातील पारध ते वालसावंगी दरम्यान असलेल्या पद्मावती गावाजवळ ही घटना घडली.

अधिक माहिती अशी की, धावडा गावातील एक कुटुंब (आई, मुलगा आणि आजी ) हे पारध जवळ असलेल्या सावंगी अवघडराव या गावी अंत्यविधीसाठी गेले होते. परत येताना त्यांच्या कारने पारध जवळील पद्मावती येथे एका दुचाकीला धडक दिली व त्यानंतर पळून जात असताना भरधाव वेगात असलेली कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळून भिषण अपघात झाला. रात्री उशिरा विहिरीत कार मध्ये अडकलेल्या वृद्ध महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अंधार असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. दरम्यान कार मधील वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
तर चालक व त्याची आई हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृती चिंताजनक असल्याने आईची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली आहे. जखमी चालकावर उपचार करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!