बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पती नाहक त्रास देत असल्याने ‘ती’ कंटाळली होती..तिच्याच गावच्या राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तिला तिने काही मार्ग काढण्यासाठी फोन लावून मी तुझ्याकडे येत असल्याचा फोन लावला.. ती त्याच्या गावाला गेली आणि घृणास्पद प्रकार घडला.. त्याने तिच्या असाहय्यतेचा फायदा घेत तिला पुणे, आळंदी येथे वासनेची शिकार बनविले. तो एवढ्यावर थांबला नाही तर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल करेल आणि तुझ्यासोबत जे केलं ते तुझ्या मुलीसोबत करणार,अशी धमकी या नराधमाने दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. ही घटना मोताळा तालुक्यातील एका गावच्या पिडीता सोबत घडली आहे. सदर बलात्कारी व पिडीता वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्यांची नावे आम्ही प्रसिद्ध करू शकत नाही.
महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे, जलद न्यायप्रक्रिया आणि समाजाच्या मानसिकतेत मोठा बदल होण्याची गरज आहे.आधुनिक विचाराची कास धरून मार्गक्रमण करणार्या जिल्ह्यात अद्यापही महिला असुरक्षितच असल्याचे समोर आले आहे. वखवखलेल्या नजरा, किळसवाणे स्पर्श कधी थांबणार? हा अनुत्तरीत प्रश्न आहे. मोताळा तालुक्यातील एका गावात असाच लज्जास्पद प्रकार पुढे आला आहे. फिर्यादी पिडीताने याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध
कायमी 00/2026 कलम 64 (1), 64 (2) (m), 351(2) भारतीय न्याय संहिता-2023 नुसार गुन्हा नोंद केलाय. या प्रकरणाची हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी व आरोपी हे वेगवेगळ्या जातीचे आहे. एकाच गावात राहणारे आहेत. फिर्यादी हिचे पती हे तिला विनाकारण त्रास देत असल्यामुळे ती कंटाळली होती. तिने या प्रकरणातील आरोपीला फोन केला आणि जामनेर, छ. संभाजीनगर, शिकापुर येथे गेली. तेव्हा आरोपी हा तेथे फिर्यादी हिला घेण्यासाठी आला आणि तिला घेवून त्याच्या गजानन महाराज मंदीरासमोर इंद्रायनी नगर, आळंदी येथील त्याच्या खोलीवर घेवून गेला. त्याची वासनांधता वाढल्याने त्याने
तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला मी तुझ्या सोबत केलेल्या संबंधाचा व्हिडीओ बनवला व तो व्हायरल करील अशी धमकी देवून वारंवार बलात्कार केला. दिनांक 05 ऑगस्ट 2026 रोजी आरोपीने फिर्यादीला म्हटले की, तु माझ्यासोबत आळंदी येथे चल, तु जर आली नाही तर मी तुझ्यासोबत आळंदी येथे केलेल्या कृत्यासारखे कृत्य तुझ्या मुलीसोबत करणार, अशी त्याने धमकी दिली. तसेच मी तुझेवर व तुझे नातेवाइकावर अॅट्रासीटीची खोटी केस करीन अशी सुध्दा या नराधमाने धमकी दिली.याप्रकरणी आता पोलीस तपास सुरू आहे.










Total Users : 3247434