spot_img
spot_img

रविकांत तुपकर यांच्या आणखी एका मागणीला यश;शेतकऱ्यांना दिलासा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखालील ५ दिवसाच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामुळे २०२५-२६ मधील अतिवृष्टी आणि गारपिटीच्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हे अन्नत्याग आंदोलनाचे यश असल्याचं म्हटलं जात आहे!

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकरी हितासाठी अनेक मागण्यास संदर्भात अन्नाचा कण न घेता सलग पाच दिवस अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर या आंदोलनाचा वनवा पेटला होता. ठिकठिकाणी चक्काजाम, सरकारी कार्यालय, वाहन पेटविण्याच्या आक्रमक घटना घडल्या होत्या.या आंदोलनाची मजबुरीने मुख्यमंत्र्यांनी दाखल घेऊन संकट मोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना बुलढाण्यात आंदोलनाची सांगता करण्यासाठी पाठविले होते. आश्वासनाअंती आंदोलन मागे घेण्यात आले परंतु तारीख पे तारीख मिळत असल्याने रविकांत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. समर्थकांनी समुद्रात समाधी आंदोलन आणि मंत्रालयातील उंच झाडावर गळ्यात फास अटकवून, हातात फटाके घेऊन आंदोलन करण्यात आले होते.तुकाराम अधिवेशन काळात विधानभवनात घुसण्याचाही प्रयत्न केला होता.शेतकऱ्यांचेसातबारे फाडून व सोयाबीन -कापूस उधळून निषेध केला होता. या आक्रमक आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर झुकले.एका मागणीनंतर दुसरीही मागणी आता पूर्ण झाली आहे. २०२५-२६ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्याची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे.या निधीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!