spot_img
spot_img

BREAKING दारुच्या नशेत 32 वर्षीय युवकाने केला पेट्रोलने जाळून घेण्याचा प्रयत्न! मेहकर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन बुलडाणा येथे केले रेफर!

मेहकर (हॅलो बुलढाणा/अविनाश लाड) शहरातील जिजाऊ चौकामध्ये असलेल्या गणराज भोजनालयातील आदिवासी समाजाचा युवक पत्नी आशाबाई व चिमुकल्या मुलासह रामनगरातील देशमुख यांच्या वाड्यात खोली भाड्याने घेऊन राहत असून त्याने दारुच्या नशेत शुक्रवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहे.

त्याला तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन डॉ अमित धांडे यांनी प्रथमोपचार करुन बुलडाणा येथे रेफर केले. पेट्रोल अंगावर घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न करणारा 32 वर्षीय अमोल रमेश डाखोरे हा युवक मुळचा मांडवा फॉरेस्ट येथील रहिवासी आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मेहकर शहरातील गणराज भोजनालयात काम करत होता. मात्र दारुचे व्यसन असल्यामुळे त्याचे संसारात मन रमत नव्हते आणि त्यामुळेच त्याने नैराश्य भावनेतून स्वतःला जाळून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर यांना घटनेबाबत माहिती दिली असता त्यांनी 112 नंबरवर फोन करुन माहिती देण्यास सांगितले अमोल रमेश डाखोरे याच्यावर प्राथमिक उपचार होईपर्यंत पोलीस स्टेशन मेहकरचे कोणतेही कर्मचारी मेहकर ग्रामीण रुग्णालयात पोहचण्यास असमर्थ ठरले. मागील अनेक दिवसांपासून मेहकर पोलीस स्टेशनचा कारभार ढेपाळलेला असल्याची चर्चा मेहकर शहरात सुरु असून याबाबत बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलेश तांबे यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची चर्चा मेहकर शहरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान याबाबत अमोल डाखोरे यास आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने टेंशनमुळे एव्हढेच उत्तर दिले. वृत लिहेपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते परंतु डॉ अमित धांडे यांनी रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने तात्काळ बुलडाण्यास रेफर केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!