spot_img
spot_img

दुचाकीला द्या खास ओळख! व्हीआयपी नंबर हवाय तर बातमी वाचा..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आजकाल अनेक वाहनचालकांना आकर्षक,जरा हटके वाहन क्रमांक हवा असतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अशाप्रकारचे क्रमांक उपलब्धही करुन दिले जातात. आता दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांक वाहनधारक बुलढाणा आरटीओ कार्यालयात मिळवू शकतात. 4 ऑगस्ट पासून MH 28 CH 0001 ते 999 पर्यंतची दुचाकीसाठी नवीन मालिका निर्गमित करण्यात आल्याची माहिती

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांनी दिली आहे.

आजकाल प्रत्येकालाच काही तरी वेगळं, हटके आणि लक्षवेधी हवं असतं. मग ते स्वतःचं स्टाईल स्टेटमेंट असो किंवा वाहनावरचा नंबर! सध्या एक नवा ट्रेंड जोरात आहे तो म्हणजे फॅन्सी नंबर प्लेट घेण्याचा! केवळ जिल्ह्यात नाही तर राज्यभरात गोल्डन नंबरची क्रेझ प्रचंड आहे. काही वेळा हे खास नंबर इतके लोकप्रिय असतात की ते लिलावातून विकले जातात, आणि त्यांच्या किंमती थेट हजारांपासून लाखों रुपयांपर्यंत पोहोचतात! बुलढाणा जिल्ह्यातील अनेक दुचाकी चालकांना खास नंबर असावा अशी इच्छा आहे. काही जण तर या लकी नंबरसाठी मोठी रक्कम देखील मोजायला तयार आहेत. आपल्या गाडीला फॅन्सी नंबर किंवा व्हीआयपी नंबर मिळावा म्हणून ही चाललेली धडपड आता थांबणार आहे. कारण बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेशानुसार,4 ऑगस्ट पासून MH 28 CH 0001 ते 999 पर्यंतची दुचाकीसाठी नवीन मालिका निर्गमित केली आहे. तेव्हा वेळ दवडू नका, थेट आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!