मेहकर (हॅलो बुलढाणा) अलीकडे सरकारी कार्यालयांना लाचखोरीची कीड लागल्याचे दिसून येते.आज तर वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, मेहकरच्या बेलीपने ₹ 15 हजाराची मागणी करून तडजोडी अंती ₹ 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.जगदीश सुखदेव राऊत (वय 31) दिवाणी न्यायालय मेहकर, रा. माळीपूरा वार्ड नं.3 साखरखेर्डा, ता.सिंदखेड राजा जि. बुलढाणा असे या लाचखोराचे नाव आहे.
सरकारी कार्यालयात गलेलठ्ठ पगार असूनही, वर्कमय ची सवय काहींच्या अंगवळणी पडल्याचे अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईवरून दिसून येते. आज 6 ऑगस्ट रोजी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, मेहकरचा लाचखोर बेलीप जगदीश सुखदेव राऊत रंगेहात सापळ्यात अडकला आहे. तक्रारदाराविरुद्ध सुरू असलेल्या दाव्यामध्ये न्यायालयाने काढलेल्या मालमत्तेच्या जप्तीचा वॉरंट न बजावता परत करण्यासाठी बेलीप राऊतने ₹ 15 हजार रुपये मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो कडे करण्यात आली होती. दरम्यान मेहकर न्यायालयाच्या आवारात दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास सापळा रचण्यात आला असता, तक्रारदाराकडून ₹ 15 हजाराची मागणी केल्यानंतर तडजोडी अंती ₹10 हजार रुपये स्वीकारले. दुपारी 2 वाजता राऊत याला मेहकर बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात राऊत विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई बुलढाणा अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली आहे.










Total Users : 3239308