spot_img
spot_img

BIG NEWS! मुंबईत बंद दाराआड झाली ‘ती’ चर्चा अन् चिखलीत उडाला राजकीय धुरळा! माजी.आमदार राहुल बोंद्रे समर्थकांसह बदलणार झेंडा? नगरसेवकही तयार असल्याची चर्चा; पण ‘हॅलो बुलढाणा’च्या फोनवर राहुलभाऊंनी केला असा खुलासा की… कथेला मिळाला नवा ट्विस्ट!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात बुधवारी अचानक मोठा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष तथा दोन वेळचे माजी आमदार राहुल बोंद्रे हे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात धडकली. मुंबईत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांसोबत बंद दाराआड महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचीही चर्चा पसरल्याने चिखलीपासून बुलढाण्यापर्यंत राजकीय तापमान चांगलेच वाढले.

राहुल बोंद्रे यांनी २००९ आणि २०१४ मध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांत त्यांना भाजपच्या श्वेता महाले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. २०२४ मध्येही त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.

सलग दोन पराभवांनंतर बोंद्रे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपची वाट धरली. त्यातच त्यांच्या संस्थांबाबत तक्रारी, चौकशी आणि प्रशासकीय कारवायांच्या चर्चा सुरू असल्याने राजकीय तणाव वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निकटवर्तीयांच्या आग्रहाखातर बोंद्रे सत्ताधारी पक्षाच्या दिशेने पाऊल टाकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला.

बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्ते कोणता झेंडा हाती घेणार, याकडेही लक्ष लागले होते. बोंद्रे काँग्रेसमधून बाहेर पडल्यास चिखलीत काँग्रेसचा दमदार चेहरा कोण, हा प्रश्नही ऐरणीवर आला.

पण कहानी में ट्विस्ट बाकी था! ‘हॅलो बुलढाणा’ने माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट शब्दांत सांगितले- “नेहमीसारखी अफवा आहे!”

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!