spot_img
spot_img

BREAKING भरदुपारी स्मशानभूमीमागे पाठलाग… दिव्यांग तरुणीच्या असहायतेचा घेतला घृणास्पद फायदा! बोरगाव वसूत घडलेल्या ‘त्या’ घटनेने चिखली तालुका संतापला!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) बोरगाव वसु परिसरात २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बोरगाव वसु येथील स्मशानभूमीच्या पाठीमागील नाल्याजवळ शौचासाठी जात होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्या दिव्यांगपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शेख रब्बानी शेख गणी, रा. सवणा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केलाअसून त्याला अटक झाली आहे.या धक्कादायक घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!