देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जालना–पुलगाव राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यात यावी, तसेच सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व पुलांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत, आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही युवा आमदार मनोज कायंदे यांना दिली.










Total Users : 3231433