बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली तालुक्यातील रायपूर येथील भारत पेट्रोलियम एजन्सीकडून गॅस सिलेंडर एजन्सीचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार दिल्याने तक्रारदारालाच ‘मी आत्महत्या करून चिठ्ठीत तुझे नाव टाकतो’ अशी धमकी दिल्याची तक्रार जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना शिवसेना उपशहर प्रमुख राहुल वरवंडे यांनी 5 ऑगस्टला एका निवेदनाद्वारे दिली आहे.
शिवसेना (उबाठा) चिखलीचे उपशहर प्रमुख राहुल वरवंडे यांनी 18 मे 2026 रोजी
रायपूर येथील भारत पेट्रोलियम एजन्सीकडून गॅस सिलेंडर एजन्सीचा काळाबाजार सुरू असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली होती.मात्र या संदर्भात कुठलीच कार्यवाही झाली नाही.उलटपक्षी तक्रारकर्ता म्हणून माझ्यावरच दबाव टाकण्यात येत असल्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे राहुल वरवंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. किरकोळ गॅस वितरक यांनी ‘मी आत्महत्या करतो व सुसाईड नोट मध्ये तुझे नाव टाकतो’ अशी धमकी दिली आहे. आज 950 रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर सर्रास 1500 रुपयांना विकले जात आहे. गॅसचा असा काळाबाजार करून गरिबांना लुटायचे आणि आवाज उठवणाऱ्याला उलट धमक्या द्यायच्या हा कुठला न्याय आहे? जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालावे असेही राहुल वरवंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.










Total Users : 3231427