spot_img
spot_img

‘दामिनी पथका’ने छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांचे ‘कान उपटले!’

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) पोलीस अधिक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक प्रमुख पो.हे. कॉ.जयश्री काकडे व सहकारी म.पो.कॉ.वर्षा शिंदे यांनी शहरात विशेष मोहीम राबवून टवाळखोरांवर धडक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेज परिसर आणि बस स्थानकांवर महिलांची छेडछाड करणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांचे पथकाने ‘कान उपटले’ त्यांच्या पालकांसमोर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

शहरात ​गेल्या काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये, बाजार आणि बस स्टॉप परिसरात टवाळखोर तरुण महिलांची छेड काढत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. याची गंभीर दखल घेत दामिनी पथकाने साध्या वेषात गस्त वाढवली. या मोहिमेअंतर्गत:
​अनेक टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.​काही जणांना कडक इशारा देऊन आणि त्यांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करून सोडण्यात आले.
​संशयित वाहनांची तपासणी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

▪️उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे म्हणाले..

​”महिला आणि मुलींची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक ठिकाणी छेडछाड किंवा त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महिलांनी कोणत्याही प्रसंगी न घाबरता पोलिसांशी किंवा दामिनी पथकाशी संपर्क साधावा.”

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!