बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी नियमितपणे धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणाऱ्या मुख्य मार्ग असलेल्या टिपु सुल्तान चौक परिसरात खोदण्यात आलेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आज मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी अल-मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांना एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे.की,तेलगु नगर ते टिपु सुल्तान चौक, बगीचा परिसरतील असलेली पाणीची टाकी गल्ली आणि राजा मेंबर यांच्या घरापासुन ते मिर्झा नगरकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासुन पाणीची नवीन पाईपलाईन टाकण्या करीता खोदण्यात आलेली आहे. सदर पाईपलाईन टाकण्याचे काम संत गतिने सुरू असुन परिसरातील नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सदर दोन्ही रस्ते मुख्य असुन शाळेकरी मुलांना सुध्दा घेण्याकरीता परिसरात स्कुल बस येत नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे येत्या 27 ऑगस्टला पैगंबर मोहम्मद साहेब यांची १५०१ वीं जयंती साजरी केली जाणार आहे. मोहम्मद साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन परिसरात केले जातात आणि प्रमुख जुलुस अर्थात शोभायात्रा याच मार्गाने जाते. तरी सदरच्या परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर करून रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या अंती देण्यात आला आहे. निवेदनावर अल मदीना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख, असीफ हुसैन, आहेतेशार खान यांची स्वाक्षरी आहे.










Total Users : 3223212