डोणगाव (हॅलो बुलढाणा) स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागून अनेक अपघात झाले असून,आजही 4 ऑगस्ट रोजी दुपारी समोरील वाहनाला पाठीमागच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आलेली आहे. ही घटना डोणगाव पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडोर चॅनल क्रमांक 269.400 वर घडली आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आजकाल मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जात आहे.या समृद्धी महामार्गावर झोपेची डूलकी लागून अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आज 4 ऑगस्टला दुपारी ही एक भीषण अपघात झाला. RJ 11GD 4412 क्रमांकाचे वाहन समोरील वाहनास पाठीमागून धडकले.ही धडक एवढी भीषण होती की, धडक देणाऱ्या वाहनातील चालक लेकराज ( वय 26) रा. तेढीबघीया ता.जि. आग्रा उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील उपकेंद्र फरदापुर येथील मदत केंद्रातील पोलीस पथक पोहचले. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतक लेखराजला झोपेची डुलकी लागल्याने धडक लागल्याची कबुली हेल्पर सोनू नीरंजन निशाद रा. फरे जि मथुरा, उत्तर प्रदेश याने पोलिसांना दिली.
हेल्पर सोनू हा देखील किरकोळ जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पो. नि.सुनील सोळंके, एएस आय मंगेश खडसे, पीसी निलेश राठोड, धीरज चंदन, मंगेश तोत्रे, गजानन जाधव आदींनी मदतकार्य केले.










Total Users : 3223214