spot_img
spot_img

बसमधील महिलांच्या मंगळसूत्रांवर करायच्या हातसफाई! दोन महिला आरोपींना अटक; मलकापूर शहर पोलिसांच्या कारवाईत ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

मलकापूर (हॅलो बुलढाणा/एस. बी. शेख) मलकापूर शहर पोलिसांनी बसमधील प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे ६० हजार रुपयांचा सोन्याचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६२/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रभारी शुभम बरसाडे व त्यांच्या पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी बसमधील प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून २ ग्रॅम वजनाची सोन्याची पॉलिश असलेली पट्टी (अंदाजे किंमत २० हजार रुपये) तसेच ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके (अंदाजे किंमत ४० हजार रुपये) असा एकूण ६० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन महाले तसेच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रभारी शुभम बरसाडे, संजय निंबाळकर, आसिफ शेख, योगेश तायडे, संतोष कुमावत, प्रवीण गर्वई, गणेश बरडे, नवल राठोड, दीपक सोनोने, प्रियंका डहाके व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. चंद्रकांत शिंदे व पोहेकॉ. कौतिक बोर्डे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!