spot_img
spot_img

रात्री २.२५ वाजता दोन सावल्या आल्या… चावी घरातच, तरी १२ लाखांची ‘सेल्टॉस’ गायब; खामगावच्या CCTVमध्ये नेमकं काय कैद झालं?

खामगाव (हॅलो बुलढाणा) शहरातील शिवाजी वेस परिसरात मध्यरात्री घडलेल्या धाडसी वाहनचोरीने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. घरासमोर लॉक करून उभी केलेली तब्बल १२ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची KIA SELTOS दोन अज्ञात चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे.

व्यवसायाने व्यापारी असलेले पंकज नारायण चौधरी यांनी त्यांची MH 56 A 1458 क्रमांकाची कार १ ऑगस्ट रोजी रात्री नेहमीप्रमाणे तुळसाई अपार्टमेंटमधील भवर यांच्या दुकानासमोर उभी केली होती. रात्री १० वाजता कार जागेवर असल्याची खात्री करून ते झोपण्यासाठी गेले. मात्र, २ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता गच्चीवरून पाहिले असता कार गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विशेष म्हणजे, कारची मूळ चावी घरात ठेवलेल्या जागेवरच होती. त्यामुळे कार नेमकी कशी अनलॉक आणि सुरू करण्यात आली, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता रात्री २.२५ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती कार सुरू करून दंडे स्वामी मंदिराच्या दिशेने घेऊन जाताना दिसल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा क्रमांक २८८/२०२६ दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निलसिंग चव्हाण करीत आहेत. सीसीटीव्हीत कैद झालेले हे दोन चोरटे कोण आणि त्यांनी आधुनिक लॉकिंग यंत्रणा कशी भेदली, याचा उलगडा करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!