शेगाव (हॅलो बुलढाणा) काल झालेली जोरदार अतिवृष्टी शेगाव तालुक्यातील जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या डोलारखेड गावाला वेदना देणारी ठरली. पाण्याने घरात शिरकाव केल्याने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. येथील गजानन उत्तम देठे यांनी साठवून ठेवलेला वर्षभराचा गुराढोरांचा चारा पाण्याने वाहून गेला. प्रकल्प होण्या आधीच हे अर्धे गाव पाण्याखाली येत असताना, शासनाचे व प्रशासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्याकरिता जिगाव प्रकल्प बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, हा प्रकल्प रखडला आहे. शेगाव तालुक्यातील डोलारखेड गाव हे प्रकल्पग्रस्त असून काल झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे अर्धे अधिक गाव पाण्याखाली आले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून साहित्याची नासधूस व मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील घरं व रस्ते पाण्याखाली सापडल्याने येथील भीषण वास्तव मात्र प्रशासकीय यंत्रणेला अद्यापही दिसलेले नाही, असा आरोप आता नागरिक करीत आहेत.











Total Users : 3209909