spot_img
spot_img

BREAKING शेतकऱ्यांच्या डोळ्यात ‘पावसाचे पाणी!’ तब्बल ८४,८७०.७० हेक्टरवरील पिकांवर निसर्गाची टाच! अतिवृष्टीने ४९५ गाव बाधित; ११३४३९ शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न गेले वाहून!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला असून, जिल्ह्यातील तब्बल ८४,८७.७० हेक्टरवरील पिके उध्वस्त झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

अतिवृष्टीने २९ ते ३१ जुलै दरम्यान बुलढाणा जिल्ह्याला मोठा तडाखा बसला. आज जिल्ह्यातील ९२ पैकी तब्बल ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, जळगाव जामोदमध्ये अवघ्या २४ तासांत २५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पावसामुळे शेती पिके उध्वस्त झालीत.अनेक शेतात तळे साचले तर शेतजमिनी खरडून गेल्याचे चिंताक्रांत चित्र आहे.जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने २९ ते ३१ जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे शेती पिके व फळपिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासन दरबारी मंडला आहे.यातील नुकसानीचा आकडा फुगण्याची शक्यता आहे.

▪️तालुका निहाय बाधित हेक्टर क्षेत्र…

जिल्ह्यात सर्वाधिक मलकापूर तालुक्यात ३१३९९ हेक्टर तर त्या पाठोपाठ नांदुरा तालुक्यातील २७९४१ शेती पिके उध्वस्त झाली आहेत. त्यानंतर संग्रामपुर तालुक्यात १२९८४,जळगाव जामोद ४२५९ शेगाव ८०४० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा ७९, चिखली ११.७०, मेहकरमध्ये १५० हेक्टर वर नुकसान झाले आहे.लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यात नुकसान झाल्याची नोंद नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!