spot_img
spot_img

BREAKING! सुसाईड नोटपासून विधानसभेपर्यंत पोहोचले प्रकरण… अखेर ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीचा मोठा IMPACT! आमदार सिद्धार्थ खरातांच्या तारांकित प्रश्नानंतर विराज प्रोफाईल्सच्या CEO जितेंद्र गर्ग यांना न्यायालयाचा दणका; अंतरिम संरक्षण नाकारले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बोईसर येथील विराज प्रोफाईल्स स्टेनलेस स्टील कंपनीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले बुलढाण्याचे स्व. प्रदीप सुखदेव जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा कंपनीचे सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांना पालघर अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा झटका देत अटकपूर्व जामिनाचे अंतरिम संरक्षण वाढविण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

प्रदीप जाधव यांनी कंपनीतील कथित मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक, जातिवाचक शिवीगाळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांनी केला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कथित त्रास देणाऱ्यांची नावे नमूद असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पत्नी वंदना जाधव यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला बीएनएस कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘हॅलो बुलढाणा’ने हे प्रकरण सर्वप्रथम आक्रमकपणे जनतेसमोर आणत जाधव कुटुंबीयांच्या न्यायाच्या लढ्याला आवाज दिला होता. त्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी हे प्रकरण विधानमंडळात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केले. पुढे आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांचा समावेश करण्यात आला.

अटकपूर्व जामीन अर्ज क्रमांक २१४/२०२६ मध्ये अंतरिम संरक्षण वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. रहाणे यांनी एससी-एसटी कायद्याचे कलम १८ लागू झाल्यानंतर अटकपूर्व जामिनाची तरतूद लागू होत नसल्याचे स्पष्ट करत ३१ जुलै २०२६ रोजी अर्ज फेटाळला.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणेला महत्त्वाचे बळ मिळाले असून आता गर्ग यांच्यावर अटकेची कारवाई कधी होणार, तसेच उर्वरित आरोपींवर कोणती कठोर पावले उचलली जाणार, याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!