spot_img
spot_img

जयश्रीताई शेळके यांनी येळगाव धरण व पुलाची केली पहाणी! म्हणाल्या.. ‘पुराच्या पाण्यातून कुणीही वाहने टाकू नये!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्याने बुलढाणा शहरालगतचे येळगाव धरण 100% भरले असून, बुलढाणा- चिखली महामार्गावरील साखळी गावा नजीकच्या पुलावरून पाणी वाहत आहे.या पूरसदृश्य परिस्थितीची पाहणी करत शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी पुलावरून पाणी वाहत असल्याने पुराच्या पाण्यातून कुणीही वाहने टाकू नये,असे खबरदारीचे आवाहन केले आहे.

गेल्या दोन दिवसापासून बुलढाण्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्या भरभरून वाहत आहेत. जलस्तोत्रांची पाणीपातळी वाढलेली असून येळगाव धरण दुपारपर्यंतच 100% भरले आहे. पैनगंगेच्या पुराने पूला वरून पाणी वाहत असल्याने बुलढाणा- चिखली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वरून रिमझिम पाऊस आणि पुलावरून वाहणारे प्रवाही पाणी यामुळे कुणीही जीव धोक्यात घालून वाहने पुलाच्या पुरातून काढू नये,असे आवाहन शेळके यांनी केले. चिखली कडे जाणाऱ्या प्रवाशांनी सव, खूपगाव, किनोळा,केळवद या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!