बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. पैनगंगा नदी ओसंडून वाहत असल्याने आज सागवान ते नांद्रा कोळी येथील पुल पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे.या रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेत बुलढाणा पठार, मढ परिसरातून उगम पावते आणि हीच पैनगंगा नदी पुढे बुलढाणा तालुक्यातील सागवान, नांद्रा कोळी आणि येळगाव परिसरामधून वाहत पुढे जाते. गेल्या दोन दिवसापासून सततच्या पावसामुळे येळगाव धरण, सागवान नांद्रा कोळी परिसरात पैनगंगेची पाणी मोठ्या वेगाने वाहत आहे. त्यामुळे येळगाव धरणावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अशीच सागवान नांद्रा कोळी रस्त्याची स्थिती असल्याने येथील ही रहदारी धोक्याची घंटा ठरली आहे.
येळगाव धरण 80 टक्के भरले आहे.पाऊस असाच बरसत राहिला तर पैनगंगा नदीला आणखी पूर येऊन येळगाव धरण 100% भरून ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. येळगाव धरण 80 टक्के भरल्यामुळे बुलढाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.










Total Users : 3248791