spot_img
spot_img

हनवतखेड धरण ओव्हरफ्लो! गावाकडे जाणारा मार्ग धोक्यात; चौकशी करूनच गिरडा मार्गे प्रवास करा!

मोताळा (हॅलो बुलढाणा) मोताळा तालुक्यातील हनवतखेड (वनग्राम) येथील धरण ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे गावाकडे येणाऱ्या मार्गांवर पाण्याचा वेग वाढला असून वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. गावाकडे येणारे शासकीय कर्मचारी, नागरिक तसेच वाहनचालकांनी रस्त्याची परिस्थिती आणि पाण्याची पातळी याबाबत आधी चौकशी करूनच प्रवास करावा, असे आवाहन पाहणे रावळे यांनी केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने थेट मार्ग धोकादायक ठरत असल्यास गिरडा मार्गे पर्यायी वाहतूक वळवावी. कोणत्याही परिस्थितीत वाहत्या पाण्यातून वाहन नेण्याचा धोका पत्करू नये.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!