spot_img
spot_img

शेतकऱ्यांचा ‘बाप’ काढल्याने.. बँक मॅनेजरच्या कानशिलात लागावली! महायुतीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ठरतेय डोकेदुखी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सध्या डोकेदुखी ठरत आहे.या योजनेवरून बँकांमध्ये अधिकारी आणि शेतकऱ्यामध्ये ‘तू तू मैं मैं’ होत असल्याचे चित्र आहे.आज तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावल्याने खळबळ माजली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथे सेंट्रल बँकेच्या शाखेत हा प्रकार समोर आला. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील हे खामगाव येथील सेंट्रल बँकेमध्ये गेले होते. त्यांनी कर्जमाफी योजनेबद्दल विचारणा केली होती. पण  कर्जमाफीची विचारपूस करण्यासाठी जाणारा शेतकऱ्यांचा बँक मॅनेजर शिवाजी कडने बाप काढल्याचा आरोप स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केला.
“शेतकऱ्याचा बाप कसा काढला?, असं विचारत अमोल पाटील यांनी सेंट्रल बँकेच्या मॅनेजरच्या कानाशिलात लगावली.
“वारंवार तुम्ही बँकेत कशाला येता बँक काय तुमच्या बापाची आहे का? अशा भाषेत शेतकऱ्यांना मॅनेजरने हिणवलं. ही लोक शेतकऱ्यांना ५ लाख रुपये भरायला लावत आहे. शेतकऱ्यांना म्हणताय तुमच्या बापाची बँक आहे का, शेतकऱ्यांचा बाप काढणारे हे कोण आहे?असे प्रश्न विचारत संतापलेल्या
अमोल पाटील यांनी सेंट्रल बँकेचे मॅनेजर शिवाजी कड यांना चोप दिल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना असाच त्रास दिला तर स्वाभिमानी पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!