जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) देऊळगाव साखरशा येथे सुरू असलेल्या कथित गोवंश हत्येच्या प्रकारावर जानेफळ पोलिसांनी पहाटेच धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. ३० जुलै २०२६ रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापा टाकला. या कारवाईत दोन संशयितांना घटनास्थळावरून रंगेहात पकडून अटक करण्यात आली.
शेख अफसर शेख वाहब आणि शेख रिजवान शेख गफार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल १ क्विंटल २६ किलो गोमांस, तसेच गोवंश कापण्यासाठी वापरण्यात येणारे धारदार साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४३ हजार १५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय जाधव व पोलीस पथकाने केली. दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश हत्या करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.










Total Users : 3241952