spot_img
spot_img

वाघ वाचवण्यासाठी रनर्स धावले!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाघांच्या घटणाऱ्या संख्येबाबत जनजागृती करणं, त्यांच्या संरक्षणासाठी लोकसहभाग वाढवणं आणि वाघांच्या अधिवासाचं संवर्धन करणं हे

जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागचं उद्दिष्ट आहे.याच पार्श्वभूमीवर काल 29 जुलैला उपवनसंरक्षक कार्यालय, वनविभाग बुलढाणा व मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने टायगर रन चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान वाघ वाचवू या म्हणत.. रनर्स उस्फूर्तपणे धावले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यात वाघांची मोठी भूमिका आहे, त्यांचा ऱ्हास अनेक प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतो. याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. याच अनुषंगाने पर्यावरण रक्षण व जंगली प्राण्यांसोबतच वाघांचे संरक्षण करण्याविषयी या टायगर रन
च्या माध्यमातून जागृती करण्यात आली. वन विभागाच्या राणी बागेपासून सुरुवात झालेला रन एआरडी सिनेमा पासून परत राणीबागेपर्यंत असा आयोजित केला होता. या टायगर रन मध्ये बुलढाणा शहरातील विविध संघटनांच्या महिला व पुरुष रनर्स उस्फुर्त सहभागी झाले होते. याप्रसंगी श्रीनिका पाटील या चिमुकलीने साकारलेली वाघाची वेशभूषा लक्षवेधी ठरली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!