spot_img
spot_img

CRIME NEWS! पत्नीच्या ‘दुसऱ्या लग्नाचे’ फोटो पाहिले अन् २२ वर्षीय श्रीकृष्णची जगण्याची इच्छाच संपली? निंभोरा बु.मध्ये गळफासाने अंत; पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा… जळगाव जामोद तालुक्यात खळबळ!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील निंभोरा बु येथे २२ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. मृतकाचे वडील गजानन प्रल्हाद हरमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह संबंधित कलमांन्वये जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एफआयआरमधून समोर आली आहे.

एफआयआरनुसार, श्रीकृष्ण गजानन हरमकर याचा विवाह ४ मे २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर तो पत्नीसोबत पुण्यात राहत होता. मात्र पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२५ पासून पत्नी वेगळी राहत होती. तिला परत आणण्यासाठी श्रीकृष्णने अनेकदा प्रयत्न केले; मात्र त्याला नकार देण्यात आला, तसेच एका प्रसंगी सासरच्या मंडळींकडून मारहाण झाल्याचाही आरोप आहे.

दरम्यान, पत्नीने सोशल मीडियावर कथित दुसऱ्या लग्नाचे फोटो टाकल्याचे पाहून श्रीकृष्णला मोठा मानसिक धक्का बसल्याचा दावा वडिलांनी केला आहे. त्यानंतर १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता निंभोरा बु. येथील राहत्या घरात त्याने गळफास घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी बीएनएस कलम १०८ आणि ११५(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, एफआयआरमधील आरोपांची सत्यता आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!