spot_img
spot_img

उद्यापासून ‘महा धमाका’! सरकारी भूखंडांच्या ‘श्रीखंडा’चा फुटणार भांडाफोड; ‘चड्डाची चड्डी फाटणार’, ‘झेलते’ला पालते करणार? ‘हॅलो बुलढाणा’च्या हाती धक्कादायक कागदपत्रे!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहर नगरपालिका हद्दीतील शासकीय भूखंडांच्या कथित गैरव्यवहाराचा ‘हॅलो बुलढाणा’ने मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता या प्रकरणातील आणखी खळबळजनक कागदपत्रे आणि नोंदी समोर येत असल्याची माहिती आहे. उद्यापासून या कथित भूखंड घोटाळ्याचा टप्प्याटप्प्याने ‘महा धमाका’ होणार असून, अनेक तथाकथित प्रतिष्ठित चेहऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सरकारी मालकीच्या काही जागांची कथित बोगस आणि संशयास्पद कागदपत्रे तयार करून शहरात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या काही उद्योजकांना भरगच्च भूखंडांचे जणू ‘श्रीखंड’च वाढण्यात आले काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.नियमबाह्य पद्धतीने खरेदी-विक्री,(सरकार ते उद्योजक) बनावट कागदपत्रे रूपांतरण फेरफार’ सातबारा सह इतर कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रियेत नेमका कुणा कुणाचा हात होता,याचा ‘हॅलो बुलढाणा’ पुराव्या आधारावर मागोवा घेत आहे.या कथित भूमाफिया साखळीत मुख्यालयातील संबंधित शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी,खासगी एजंट आणि इतर ‘मुख्य नायकां’ बाबतही माहिती समोर येत आहे. या प्रकरणात (को.. ते.., ..डे, प..र, मी..पा..ल, भा..ळे) अशा सांकेतिक उल्लेखांमागील चेहरे नेमके कोण,याबाबत शहरासह जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

‘चड्डा 420’ टोळीची भूमिका 3 ते 4 कलमी रोप लावायचे डजनभर फळ काढायचे? कोणाला किती भूखंड मिळाले? कागदपत्रे कुणी तयार केली? स्वाक्षरी कुणाची? बनावट शासकीय कागदपत्रे कुणाच्या आदेशाने?आणि ‘अर्धे तुम्ही-अर्धे आम्ही’चा कथित फॉर्म्युला नेमका कुठे वापरला गेला?

उद्यापासून ‘हॅलो बुलढाणा’मध्ये मोठा पर्दाफाश… ‘चड्डाची चड्डी फाटणार’ आणि ‘झेलते’ला पालते करणार? अजून बरंच काही पुढच्या बातमीपत्रात!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!